19.09.2022 : Governor presided over the Engineers’ Day programme
19.09.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत 'अभियंता दिन' कार्यक्रम संपन्न
19.09.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऍलम्नाय असोसिएशन ऑफ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित 'अभियंता दिन' कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संस्थेचे माजी विद्यार्थी असलेले विनायक पै, व्यवस्थाकीय संचालक टाटा प्रोजेक्ट्स, जगदीश कदम, अध्यक्ष राजपथ इन्फ्राकॉन, सतीश खंदारे, भापोसे, लडाखचे पोलीस प्रमुख, विलास तावडे, माजी व्यवस्थापकीय संचालक, एस्सार ऑइल व गौर गोपाल दास यांचा राज्यपालांच्या हस्ते 'सीओईपी अभिमान' पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले.