15.06.2022 : Governor released a book of poems ‘Atma Sharada’
15.06.2022 : राज्यपालांच्या हस्ते राकेश कुमार पांडेंच्या 'आत्मशारदा' काव्य संग्रहाचे प्रकाशन संपन्न
15.06.2022 : लेखक, दिग्दर्शक, साहित्यिक व समाजसेवक राकेश कुमार पांडे यांनी संकलित केलेल्या व त्यांचे वडील स्व. आत्मा प्रसाद पांडेय यांनी लिहिलेल्या 'आत्मशारदा' या काव्य संग्रहाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे संपन्न झाले. गडकरी ब्रिगेड फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक व हिंदीचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ करुणाशंकर उपाध्याय, संजीव निगम व नवनाथ चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.