02.12.2021 : Governor Koshyari launches ‘Vande Kisan’ App
02.12.2021 : राज्यपालांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी 'वंदे किसान ॲप'चे लोकार्पण
02.12.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्यवर्धनासाठी विकसित केलेल्या 'वंदे किसान ॲप'चे लोकार्पण राजभवन येथे करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते संत्रा उत्पादक शेतकरी धीरज जुनघरे, डॉ सदानंद राऊत, डॉ उदय देवळाणकर, ज्ञानेश्वर बोडके, डॉ सूर्यकांत गुंजाळ, नारायणगाव ग्रामोन्नती कृषी मंडळ, चंद्रशेखर भडसावळे, कुलगुरू डॉ संजय सावंत, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व राहीबाई पोपेरे यांचा सत्कार करण्यात आला.