07.02.2020 Governor presents SIES Packaging Awards for Excellence
07.02.2020: Governor Bhagat Singh Koshyari presented the SIES Packaging Excellence to various companies at SIES Vidyapuram, Nerul, Navi Mumbai.The awards were presented for innovation creativity, development and new concepts in packaging.
साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या स्कुल ऑफ पॅकेजिंग, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी सेंटर तर्फे पॅकेजिंग क्षेत्रातील नवसंकल्पना व गुणवत्तापूर्ण कार्यासाठी देण्यात येणारे पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते संस्थेच्या नेरुळ, नवी मुंबई येथील प्रांगणात शनिवारी प्रदान करण्यात आले. यावेळी साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर, स्कुल ऑफ पॅकेजिंगचे अध्यक्ष प्रो. पी.व्ही. नारायणन, जागतिक पॅकेजिंग संस्थेचे प्रतिनिधी ए व्ही पी एस चक्रवर्ती , एस आय ई एस चे मानद सचिव एम .व्ही. रामनारायणन आदी उपस्थित होते.