28.03.2023: भाषण :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार विजय दर्डा यांना राज्यपालांच्या हस्ते डि. लिट. प्रदान
28.03.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या मुख्य प्रमुख उपस्थितीत डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचा १७ वा दीक्षांत समारोह विद्यापीठाच्या नेरुळ येथील शैक्षणिक संकुलात संपन्न झाला. या दीक्षांत समारोहात राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व लोकमत समूहाचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांना डी.लिट. (डॉक्टर ऑफ लेटर्स) ही मानद पदवी देण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ विजय पाटील, प्र-कुलपती शिवानी पाटील, कुलगुरु वंदना मिश्रा चतुर्वेदी, डॉ. नंदिता पालशेतकर यांसह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, अधिष्ठाता, प्राध्यापक व स्नातक उपस्थित होते.