30.05.2026: राज्यपालांनी हेतू चॅरिटेबल ट्रस्ट व डिस्ट्रिक्ट लीगल सर्विसेस ऑथॉरिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग सक्षमीकरण परिषदेचे उद्घाटन केले
30.05.2026: हेतू चॅरिटेबल ट्रस्ट व डिस्ट्रिक्ट लीगल सर्विसेस ऑथॉरिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग सक्षमीकरण परिषदेचे उद्घाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मालाड मुंबई येथे संपन्न झाली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग महिलांना शिलाई मशीन, दृष्टिहीन व्यक्तींना AI स्मार्ट चष्मे, व्हीलचेयर, लॅपटॉप वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्याम चांडक व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती ( सेवानिवृत्त) के के तातेड, हेतु चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव रिखब चंद जैन, उद्योजक प्रवीण कोठारी, देवेंद्र जैन, नरेंद्र राठी, पी.जी. तापडिया आदी उपस्थित होते.