13.09.2023 : राज्यपालांच्या हस्ते ‘ऐस पैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे प्रकाशन
13.09.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थित विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्या जीवन व कार्यावर आधारित ‘ऐस पैस गप्पा नीलमताईंशी’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे राजभवन मुंबई प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉ. नीलम गोर्हे, लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, लेखिका करुणा गोखले व इतर निमंत्रित उपस्थित होते.