04.08.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत लोकभवनातील श्रीगुंडी यात्रोत्सवाला सुरुवात
04.08.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत लोकभवनातील श्रीगुंडी यात्रोत्सवाला सुरुवात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या पूजेने लोकभवन मुंबई परिसरातील पारंपरिक श्रीगुंडी देवी यात्रेला सुरुवात झाली. राज्यपालांनी देवी मंदीरामध्ये जाऊन देवीमातेची पूजा व आरती केली. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसरातील महालक्ष्मी, प्रभू राम व हनुमान यांच्या मूर्तींचे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त मुंबई, ठाणे, पालघर व इतर परिसरातील अनेक कोळी बांधवांनी देवीचे दर्शन घेतले. राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी देखील श्रीगुंडी देवीचे दर्शन घेतले. लोकभवनातील श्रीगुंडी देवीला साकळाई देवी व सागरमाता या नावांनी देखील ओळखले जाते. गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी लोकभवन परिसरातील ही एकदिवसीय यात्रा भरते. पोलीस दलातर्फे यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.