01.10.2024:राज्यपालांच्या पमुख उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे भव्य आदिवासी मेळावा संपन्न
01.10.2024: चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पोंभुर्णा येथे भव्य आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार रवींद्र जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, पोंभुर्ण्याच्या नगराध्यक्षा सुलभा पिपरे, जगन येलके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅन्सन, एसपी मुमक्का सुदर्शन यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यपालांनी या मेळाव्यात लावलेल्या विविध विभागांच्या स्टॉल्सला भेट दिली. सदर कार्यक्रमात आदिवासी बांधवांसाठी असलेल्या योजनांचे लाभवाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला होता. सुरुवातीला आदिवासी बांधवांच्या नृत्याने राज्यपालांचे स्वागत करण्यात आले.