बंद

    20.04.2022 : राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील नवउद्योजकांना साई बिझनेस क्लब पुरस्कार प्रदान

    विविध क्षेत्रातील ३० नवउद्योजकांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई येथे 'साई बिझनेस क्लब गाला' पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी साई बिझनेस क्लबच्या संस्थापिका डॉ कृती वजीर, सदस्य ऋत्विज म्हस्के, डॉ दलिप कुमार, डॉ एच एस रावत, जयेश जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते 'इंडियाना - द कल्चरल बिझ' ही उद्योग व संस्कृतींना जोडणाऱ्या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली.