29.01.2024 : राज्यपालांच्या उपस्थितीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न
29.01.2024 : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत राहुरी, जिल्हा अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारोह संपन्न झाला. दीक्षांत समारोहाला भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ राजेंद्र सिंह परोदा, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशांत कुमार पाटील, विविध विद्यापीठांचे कुलगुरु, माजी कुलगुरु, अध्यापक, स्नातक व पालक उपस्थित होते. यावेळी राज्याचे कृषि मंत्री व विद्यापीठाचे प्रकुलपती धनंजय मुंडे यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. या कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री तसेच अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महिकोचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले व सह्याद्री फार्मसीचे संचालक विलास शिंदे यांना मानद 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी ६८९५ स्नातकांना कृषि क्षेत्रातील पदव्या व पदव्युत्तर पदव्या प्रदान करण्यात आल्या.