21.01.2024: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत मणिपुर, मेघालय व त्रिपुरा या तीन राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा
21.01.2024: 'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमा अंतर्गत आज महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मणिपुर, मेघालय व त्रिपुरा या तीन राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला. त्रिपुरा येथून आलेल्या कलाकारांनी त्रिपुरा राज्याची लोकनृत्ये व संगीत सादर केले, तर मुंबईतील एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मणिपुर व मेघालय राज्यांचे लोकनृत्य सादर केले. यावेळी एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागला, अमेझिंग नमस्ते फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी, मुंबई निवासी असलेले उत्तर पूर्व राज्यातील निमंत्रित नागरिक व एचएसएनसी विद्यापीठाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
21.01.2024: The Foundation Day of Manipur, Meghalaya and Tripura was celebrated for the first time in Maharashtra Raj Bhavan in presence of State Governor Ramesh Bais. A cultural troupe from Tripura presented the folk dance and music of Tripura. Students of the HSNC University presented a cultural programme depicting the songs and dance of Manipur and Meghalaya. Vice Chancellor of HSNC University Dr Hemlata Bagla, Chairman of Amazing Namaste Foundation Atul Kulkarni, invitees from North Eastern States, members of faculty and students of HSNC University were present.