14.12.2023: नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत बिटिंग रिट्रीट समारोह
14.12.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’ समारोहाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, माजी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते. यावेळी नौदलातर्फे हेलिकॉप्टर्सचे फ्लाय पास्ट, नेव्हल सेंट्रल बँड, कुठल्याही मौखिक आदेशाशिवाय सातत्यपूर्ण कवायत आणि सी कॅडेट कोअरच्या लहान मुलींतर्फे 'हॉर्नपाइप सेलर्स डान्स' सादर करण्यात आले. मुलींच्या कवायत नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. नौदल दिनानिमित्त समुद्रातील जहाजांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
14.12.2023: Governor Ramesh Bais attended the 'Beating Retreat' and Tattoo Ceremony organised by the Western Naval Command of Indian Navy at Gateway of India in Mumbai on the occasion of Navy Day. Vice Admiral Dinesh Kumar Tripathi, Flag Officer Commanding in Chief, Western Naval Command, serving and retired officers of Indian Navy and invitees from various walks of life were present. The impressive event included breath-taking performances by the naval central band, a short operational demonstration, the Beating Retreat Ceremony, helicopter drills and fly-past, precision drill by naval personnel and the Sailor’s Dance by girls of the Sea Cadet Corps. The delightful Dance by the young cadets of the Sea Cadet Corps received thunderous applause from the audience.