Close

    22.05.2023: राजभवन येथील नुतनीकृत गिरी दर्शन बंगल्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्घाटन

    Publish Date: May 23, 2023

    राजभवन येथील नुतनीकृत गिरी दर्शन बंगल्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्घाटन

    सातारा दि. २२ – महाबळेश्वर येथील राजभवन परिसरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या गिरी दर्शन बंगल्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

    या वेळी राज्यपाल महोदयांचे प्रधान सचिव संतोषकुमार, विशेष कार्य अधिकारी महेश गोलाणी, अरुण आनंदकर, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे मंडळाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता सुरेंद्र कुमार काटकर आदी उपस्थित होते.

    राज्यपाल महोदयांनी घेतला वेण्णा लेक येथील नौका विहाराचा आनंद

    राज्यपाल रमेश बैस यांनी सहकुटुंब महाबळेश्वर येथील वेण्णा लेक येथील नौका विहाराचा आनंद घेतला.

    तसेच महाबळेश्वर येथील वेलोसिटी येथेही सहकुटुंब सदिच्छा भेट दिली.