Close

    वैविध्यपुर्ण संस्कृती हेच भारताचे वैशिष्ठ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    Publish Date: December 23, 2019

    End Date:31.12.2019

    वैविध्यपुर्ण संस्कृती हेच भारताचे वैशिष्ठ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    मुंबई दि 23 – भारत हा वैविध्यपुर्ण संस्कृतिने नटलेला आहे. विविध राज्यातील आणि दुर्गम भागातील नागरिक देशाच्या कोणत्याही प्रदेशात वास्तव करत असले तरी, स्वत:च्या संस्कृतिसोबत त्या प्रदेशाची संस्कृती जपतात आणि विकासात योगदानही देतात. हेच भारताचे वैशिष्ट आहे. विविधतेत एकता जपणा-या देशाचे नागरिक असणे ही सौभाग्यशालीबाब असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.

    बोरिवली येथील प्रमोद महाजन स्पोर्टस क्लब येथे मुंबई-उत्तराखंड महोत्सवाचे गढवाल भातृ मंडळाने नुकतेच आयोजन केले होते. महोत्सवात राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.

    राज्यपाल म्हणाले, विविध संस्कृती जपत आपण एकोप्याने राहत आहोत. हेच भारताचे वैशिष्ट्य आहे. आज उत्तराखंडचे स्थानिक नागरिक मुंबईत महोत्सव साजरा करीत आपली संस्कृती जपत आहेत. देशात कुठेही वास्तव्यास असणा-या व्यक्तीने आपली मातृभाषा जपली पाहीजे, ती जगवली पाहीजे. तुम्हाला जगवण्याची आईच्या ममत्वा एवढीच मातृभाषेतही ताकद आहे. जगात विविध भाषा, विविध संस्कृती असून एकात्मता असलेला देश म्हणून आपली ओळख आहे. पुर्वी ग्रामीण भागात प्रवासासाठी वाहन अथवा रस्ते नसायचे मात्र आज देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात शासनाच्या सक्रीय सहभागाने दळणवळणासाठी रस्ते उपलब्ध आहेत. गावांना शहरासाठी जोडून देश एकसंब्ध करण्याचा हा शासनाचा यशस्वी प्रयत्न असून, जगात भारत देश उत्तोरोत्तर प्रगती करीत राहील असे मत राज्यपाल श्री कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केले.

    यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनिल राणे, गढवाल भातृ मंडळाचे अध्यक्ष भगतसिंह बिश आदी व्यासपीठावर उपस्थित होते. योवळी सामाजिक योगदान देणा-यांना गढवाल रत्नने सन्मानित करण्यात आले.