बंद

  31.12.2020 : नवर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

  प्रकाशित तारीख: December 31, 2020

  नवर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २०२१ या नववर्षानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  करोना संसर्गामुळे २०२० हे वर्ष संपूर्ण जगाकरिता अत्यंत आव्हानात्मक होते. परंतु शाश्वत मानवी मुल्ये, करोना योद्ध्यांचे कार्य, सेवाभाव तसेच परस्पर स्नेहभावना यामुळे भारतवासीयांनी करोनाच्या आव्हानाला धैर्याने तोंड दिले. करोना विरुद्ध सावधगिरी बाळगतानाच आगामी वर्षांत आपण देशासाठी, राज्यासाठी तसेच समाजासाठी अधिक निष्ठेने व समर्पण भावनेने कार्य करण्याचा संकल्प करूया.

  २०२१ हे वर्ष सर्वांना सुख, समाधान व उत्तम आरोग्य प्रदान करो, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो व सर्वांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.