बंद

  30.06.2021 : राज्यपालांच्या उपस्थितीत भारत विकास परिषदेच्या मुलुंड शाखेचे उद्घाटन संपन्न

  प्रकाशित तारीख: June 30, 2021

  राज्यपालांच्या उपस्थितीत भारत विकास परिषदेच्या मुलुंड शाखेचे उद्घाटन संपन्न

  भारत विकास परिषदेचे संस्थापक डॉ सुरज प्रकाश यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त महाराष्ट्र कोकण प्रांताच्या वतीने बुधवारी (दि. ३०) आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत परिषदेच्या मुलुंड शाखेचे उदघाटन पार पडले.

  संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा व समर्पण ध्येय असलेल्या भारत विकास परिषदेचे सदस्य आत्मनिर्भर असून समाजातील उपेक्षित लोकांसाठी कार्य केल्यास देश शीघ्रगतीने प्रगती करेल असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. संस्थेचे संस्थापक डॉ सुरज प्रकाश तसेच भाऊराव देवरस यांना राज्यपालांनी यावेळी आदरांजली वाहिली.

  कार्यक्रमाला भारतीय विकास परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष गजेंद्र सिंह संधू, राष्ट्रीय कोश्याध्यक्ष संपत खुर्दीया, संघटन मंत्री सुरेश जैन, महाराष्ट्र कोंकण प्रांताचे अध्यक्ष महेश शर्मा, महासचिव यतीश गुजराथी उपस्थित होते. यावेळी मुलुंड शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष रत्नेश जैन, महासचिव धर्मेश मोदी व वित्त मंत्री जिग्नेश पण्डया यांचे पदग्रहण संपन्न झाले.