बंद

    28.06.2021 : सुवर्ण विजेत्या राही सरनोबतचे राज्यपालांकडून अभिनंदन

    प्रकाशित तारीख: June 28, 2021

    सुवर्ण विजेत्या राही सरनोबतचे राज्यपालांकडून अभिनंदन

    क्रोएशियाच्या ओसिजेक येथे सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताकरिता पहिले सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या नेमबाज राही सरनोबतचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिनंदन केले आहे.

    क्रोएशिया येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशनच्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तोल प्रकारात राही सरनोबतने देशासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकल्याचे समजून अतिशय आनंद झाला. टोकियो ऑलिम्पिकपूर्वी संपूर्ण क्रीडा जगताकरिता ही अतिशय उत्साहवर्धक घटना आहे. मी सुवर्णकन्या राही सरनोबतचे तसेच तिच्या प्रशिक्षक व पालकांचे या दैदिप्यमान यशाबद्दल हार्दिक अभिनंदन करतो व तिला उज्ज्वल यशासाठी सुयश चिंतितो, असे राज्यपालांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.