बंद

    29.01.2021 : राज्यपालांच्या हस्ते गणित व संगित विषयावरील प्रेरणा विशेषांकाचे प्रकाशन

    प्रकाशित तारीख: January 29, 2021

    राज्यपालांच्या हस्ते गणित व संगित विषयावरील प्रेरणा विशेषांकाचे प्रकाशन

    राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज गणित व संगित या विषयावरील प्रेरणा या हिंदी विशेंषांकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीच्या हिंदी विभागाव्दारे प्रेरणा या गणित – संगित या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

    न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीचे उप महाव्यवस्थापक अंजन डे, व्यवस्थापक, ए के लोंगानी, प्रेरणाचे संपादक डॉ अमरीश सिन्हा, अतिथी संपादक शशी भूषण तसेच न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.