बंद

    24.11.2021: राज्यपालांच्या हस्ते दिनदयाल प्रबोधिनीला भेट

    प्रकाशित तारीख: November 27, 2021

    राज्यपालांच्या हस्ते दिनदयाल प्रबोधिनीला भेट

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यवतमाळ जवळ निळोणा येथील दिनदयाल प्रबोधिनीला भेट दिली. संस्था स्थापनेचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. पारधी समाजाच्या विकासासाठी आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी करीत असलेल्या कार्याबद्दल राज्यपालांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.

    यावेळी दिनदयाल प्रबोधिनीच्या उपाध्यक्षा ज्योती चव्हाण व सचिव विजय कद्रे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाला आमदार ॲड. निलय नाईक, मदन येरावार, डॉ. संदीप धुर्वे,डॉ. अशोक उईके, नामदेव ससाने,संजीव रेड्डी बोदकूरवार तसेच निमंत्रित उपस्थित होते. राज्यपालांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व परिसरात वृक्षारोपण केले.