बंद

    23.04.2021: विरार रुग्णालय अग्निकांड दुर्घटनेबद्दल राज्यपालांना दुःख

    प्रकाशित तारीख: April 23, 2021

    विरार रुग्णालय अग्निकांड दुर्घटनेबद्दल राज्यपालांना दुःख

    विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेत झालेल्या करोना रुग्णांच्या मृत्युबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

    विरार येथील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून काही करोना रुग्णांचा मृत्यु झाल्याचे वृत्त समजून व्यथित झालो. सर्व मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आपल्या तीव्र शोकसंवेदना कळवतो व जखमी रुग्णांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.