बंद

    23.02.2022: जितेंदर सिंह शंटी व रविकिरण गायकवाड मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित

    प्रकाशित तारीख: February 23, 2022

    जितेंदर सिंह शंटी व रविकिरण गायकवाड मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित

    करोना संसर्गाच्या काळात चार हजार कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार करणारे जितेंदर सिंह शंटी व कोविड रुग्णांसाठी ऍम्ब्युलन्स व ऑक्सिजन टँकर्स पुरविणारे रविकिरण गायकवाड यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मदर तेरेसा स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    राजभवन येथे झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला हार्मनी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ अब्राहम मथाई व सुसान अब्राहम उपस्थित होते.