बंद

  22.04.2021: गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

  प्रकाशित तारीख: April 22, 2021

  गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध संस्कृत विद्वान पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
  सोलापूरच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ संस्कृत विद्वान, अध्यापक पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. दिवंगत पंडित बिराजदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबीयांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

  ****