बंद

  18.10.2021 : जामिया हमदर्द अभिमत विद्यापीठाच्या एका वेबिनारचे उदघाटन

  प्रकाशित तारीख: October 21, 2021

  *जामिया हमदर्द अभिमत विद्यापीठाच्या एका वेबिनारचे उदघाटन*

  जागतिक अन्न दिनानिमित्त जामिया हमदर्द अभिमत विद्यापीठाच्या पर्यावरण गुणवत्ता सेलच्या वतीने अन्न सुरक्षा या विषयावर आयोजित एका वेबिनारचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दूरस्थ माध्यमातून केले.

  भारतात अन्नाला पूर्णब्रह्म म्हटले जाते, त्यामुळे अन्नाचा एकही कण तसेच पाण्याचा एकही थेंब वाया जाणार नाही या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती झाली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतर भारत अन्नधान्य निर्मितीत स्वयंपूर्ण झाला असला तरीही पोषण सुरक्षा देण्याच्या प्रयत्न झाले पाहिजे असे मत राज्यपालांनी व्यक्त केले.

  चर्चासत्राला जामिया हमदर्द विद्यापीठाचे कुलपती हमीद अहमद, कुलगुरू प्रो. एम. अफशर आलम, चर्चासत्राचे अध्यक्ष प्रो. डॉ एम झेड अब्दीन, नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेसचे माजी अध्यक्ष प्रो. के सी बन्सल व चर्चासत्राच्या निमंत्रक डॉ झीनत इकबाल प्रामुख्याने उपस्थित होते.