बंद

    18.02.2022: पंतप्रधानांच्या दूरस्थ उपस्थितीत ठाणे व दिवा उपनगरीय स्टेशन मधील ५ व्या व ६ व्या रेल्वे लाईन्सचे लोकार्पण

    प्रकाशित तारीख: February 19, 2022

    पंतप्रधानांच्या दूरस्थ उपस्थितीत ठाणे व दिवा उपनगरीय स्टेशन मधील ५ व्या व ६ व्या रेल्वे लाईन्सचे लोकार्पण

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत ठाणे व दिवा उपनगरीय स्टेशन मधील ५ व्या व ६ व्या रेल्वे लाईन्सचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी अतिरिक्त उपनगरी रेल्वे गाडीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजभवन येथून दूरदृश्य माध्यमातून उपस्थित होते.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी विविध ठिकाणांहून कार्यक्रमाला उपस्थित होते.