बंद

    17.09.2021: राज्यपालांची भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिराला भेट

    प्रकाशित तारीख: September 17, 2021

    राज्यपालांची भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिराला भेट

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुणे येथील भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिराला भेट देऊन तेथील ग्रंथसंपदा व प्राचीन हस्तलिखितांची पाहणी केली.

    यावेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, विश्वस्त राहुल सोलापूरकर व संचालक श्रीनिवास कुलकर्णी यांनी राज्यपालांना संस्थेची माहिती दिली.