बंद

  17.09.2021 : भांडारकर इन्स्टिट्यूट पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते करोना योध्यांचा सत्कार

  प्रकाशित तारीख: September 17, 2021

  भांडारकर इन्स्टिट्यूट पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते करोना योध्यांचा सत्कार

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त करोना संकटकाळात अविरत कार्यरत सेवाभावी संस्थाचा प्रातिनिधिक सन्मान सोहळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत भांडारकर इन्स्टिट्यूट पुणे येथे पार पडला .

  सन्मान सोहळ्याचे आयोजन समर्थ युवा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले होते.
  यावेळी खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आ. चंदकांत पाटील, जगदीश मुळीक, आ. माधुरी मिसाळ, समर्थ युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते.

  राज्यपालांच्या हस्ते पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड-१९ चे सुधीर मेहता, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, इस्कॉनचे संजय भोसले, रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे प्रतिनिधी अश्विनीकुमार व महेश कर्पे यांचा सत्कार करण्यात आला.