बंद

  17.06.2022: सहस्त्रचंद्र दर्शनानिमित्त विव‍िध मान्यवरांकडून राज्यपालांचे अभिष्टचिंतन

  प्रकाशित तारीख: June 17, 2022

  सहस्त्रचंद्र दर्शनानिमित्त विव‍िध मान्यवरांकडून राज्यपालांचे अभिष्टचिंतन

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. १७) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांसह विविध मान्यवरांनी राज्यपालांचे अभिष्टचितंन केले. राष्ट्रपतींनी दूरध्वनी करुन तसेच पत्राव्दारे राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.

  उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंन्द्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निबांळकर, खासदार प्रफुल पटेल, आमदार मंगल प्रभात लोढा आदींनी राज्यपाल कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना सहस्त्रचंद्रदर्शन दिनाच्या शुभेच्छा द‍िल्या.

  सकाळी राज्यपालांनी वाढदिवसानिम‍ित्त सिध्दीविनायक मंदिरात जाऊन व‍िघ्नहर्त्याचे दर्शन घेतले.

  केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, आंध्रप्रदेशचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय राज्यमंत्री अजय भट, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील दूरध्वनीवरुन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.