बंद

  17.06.2021: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, गृहमंत्री यांनी केले अभिष्टचिंतन ७९ व्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांचेकडून राज्यपालांना शुभेच्छा

  प्रकाशित तारीख: June 17, 2021

  राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, गृहमंत्री यांनी केले अभिष्टचिंतन
  ७९ व्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांचेकडून राज्यपालांना शुभेच्छा

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. १७) राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचे दूरध्वनीवरून अभिष्टचिंतन केले.
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री राजेश टोपे, महापौर किशोरी पेडणेकर, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी यांनी देखील राज्यपालांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
  राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र, उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत,नारायण राणे, अरविंद सावंत, यांनी देखील राज्यपालांना शुभेच्छा कळविल्या.

  ****