बंद

    17.02.2023: मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना निरोप

    प्रकाशित तारीख: February 17, 2023

    मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना निरोप

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली. यावेळी उभयतांनी राज्यपालांना भावी वाटचालीसाठी व दीर्घ आयुरारोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.