बंद

    17.02.2022: सुधीर जोशी उत्तम संघटक, अभ्यासू नेते : राज्यपाल

    प्रकाशित तारीख: February 17, 2022

    सुधीर जोशी उत्तम संघटक, अभ्यासू नेते : राज्यपाल

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी मंत्री तसेच मुंबईचे माजी महापौर सुधीर जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

    श्री सुधीर जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. श्री जोशी उत्तम संघटक तसेच अभ्यासू व लढवय्ये नेते होते. कामगार तसेच स्थानिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. मुंबईचे महापौर, विधान परिषद सदस्य, विरोधी पक्षनेते व राज्याचे मंत्री या नात्याने त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबिय व चाहत्यांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.