बंद

  16.10.2020: नवरात्रीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

  प्रकाशित तारीख: October 16, 2020

  नवरात्रीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवरात्र व दूर्गा पूजा उत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

  नवरात्रीच्या मंगलपर्वावर मी राज्यांतील सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो तसेच सर्वांच्या सुख, समाधान व संपन्नतेसाठी शक्तीरुपिणी देवी दुर्गामातेकडे प्रार्थना करतो. नवरात्रीचा उत्सव मातृशक्तीच्या विविध रुपांचे स्मरण देतो तसेच असत्यावर सत्याच्या विजयाची ग्वाही देतो.

  यंदा करोनामुळे आपण आव्हानात्मक परिस्थितीतून जात असल्यामुळे नवरात्र उत्सव सर्वांनी साधेपणाने, आरोग्य विषयक जनजागृती, रक्तदान, प्लाझ्मा दान तसेच इतर समाजपयोगी उपक्रम राबवून साजरा करावा असे आवाहन करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.

  *****