बंद

    16.06.2020- दिनू रणदिवे यांच्या निधनाबददल राज्यपालांना दु:ख

    प्रकाशित तारीख: June 16, 2020

    दिनू रणदिवे यांच्या निधनाबददल राज्यपालांना दु:ख

    ज्येष्ठ पत्रकार, स्वांतत्र्यसैनिक व संयुक्त महाराष्ट्राच्या लढयातील शिलेदार दिनू रणदिवे यांच्या निधनाबददल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

    श्री दिनू रणदिवे महाराष्ट्र राज्‍य स्थापनेच्या पूर्वीपासून ते आजपर्यंत अशा एका प्रदीर्घ कालखंडाचे सजग साक्षीदार होते. आपल्या सशक्त लेखणीच्या माध्यमातून रणदिवे यांनी गरीब व उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. गेल्या सहा दशकांमध्ये रणदिवे यांनी राज्यातील अनेक सामाजिक चळवळींमध्ये सक्रीय सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या पत्रकारितेचा इतिहास रणदिवे यांच्या गौरवशाली योगदानाच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण राहील. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक लढवय्या पत्रकार गमवला आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.