बंद

  14.10.2021: राज्यपालांची राजभवन नवरात्री मंडळाला भेट

  प्रकाशित तारीख: October 15, 2021

  राज्यपालांची राजभवन नवरात्री मंडळाला भेट
  अंबेमातेच्या चरणी राज्यपाल नतमस्तक

  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि १४) राजभवन कर्मचारी संकुलातील सार्वजनिक नवरात्र मंडळाला भेट देऊन कर्मचाऱ्यांसमवेत देवीची आरती केली. राज्यपाल अंबेमातेसमोर नतमस्तक झाले व उपस्थितांशी संवाद साधला.

  यावेळी लहान मुलांनी तयार केलेल्या चित्रकला व वस्तू प्रदर्शनाला भेट दिली तसेच लहान मुलांनी सादर केलेली गाणी ऐकली. राजभवन परिसरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यंदा स्थापनेचे हिरक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.