बंद

    13.11.2020 : वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

    प्रकाशित तारीख: November 13, 2020

    वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

    माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान भवन परिसरातील वसंतदादांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे प्रामुख्याने उपस्थित होत्या.