बंद

    12.12.2021: पुणे येथील सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीदान समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

    प्रकाशित तारीख: December 13, 2021

    पुणे येथील सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीदान समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

    पुणे येथील सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा १८ वा पदवीदान समारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाला सिम्बॉयसिसचे कुलपती डॉ.एस.बी. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ.विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ.रजनी गुप्ते, कुलसचिव डॉ.एम.एस.शेजुळ, परीक्षा नियंत्रक श्रद्धा चितळे आदी उपस्थित होते.

    राज्यपालांच्या हस्ते विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले, तसेच विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.