बंद

  11.12.2021: व्दितीय आंतरराष्ट्रीय छापाकला व्दिवार्षिकीय महोत्सवास राज्यपालांची भेट

  प्रकाशित तारीख: December 13, 2021

  व्दितीय आंतरराष्ट्रीय छापाकला व्दिवार्षिकीय महोत्सवास राज्यपालांची भेट

  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ललित कला अकादमीतर्फे जहांगिर कलादालन मुंबई येथे आयोजित व्दितीय आंतरराष्ट्रीय छापाकला व्दिवार्षिकीय महोत्सवाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली. यावेळी राज्यपालांनी प्रदर्शनातील विविध कलाकृती पाहिल्या तसेच पुरस्कार वितरण केले.
  कार्यक्रमाला ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ उत्तम पाचारणे, खासदार गोपाळ शेटटी तसेच देशाच्या विविध भागातील कलाकार उपस्थित होते.
  प्रसिद्ध कलाकार सोमनाथ होर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यपालांच्या हस्ते त्यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन करण्यात आले.
  राज्यपालांच्या हस्ते प्रत्येकी २ लाख रुपयांचे पाच पुरस्कार तसेच दहा विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.