बंद

  11.06.2021 : समाजसेविका राणी पोद्दार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

  प्रकाशित तारीख: June 11, 2021

  समाजसेविका राणी पोद्दार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध उद्योजिका व समाजसेविका राणी पोद्दार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

  उद्योजिका व समाजसेविका श्रीमती राणी पोद्दार यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. पंचम संस्थेच्या संस्थापिका असलेल्या राणी पोद्दार यांनी शहरात विविध ठिकाणी पाण्याचे प्याऊ स्थापन केले. महिला सक्षमीकरण, बेटी बचाओ अभियान, तसेच गोरगरीबांसाठी नेत्रचिकित्सा शिबीर आयोजन या कार्यात त्या अग्रेसर होत्या.

  करोना काळात देखील राणी पोद्दार यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या आप्तेष्टांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.