बंद

    11.02.2023: राज्यपालांच्या हस्ते १३ व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे उदघाटन

    प्रकाशित तारीख: February 12, 2023

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ९ दिवस चालणाऱ्या १३ व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे उदघाटन आझाद मैदान मुंबई येथे आज करण्यात आले.

    उदघाटन सत्राला केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री जी. किसन रेडडी, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या सहसचिव अमिता साराभाई, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केद्राचे संचालक डॉ दीपक खिरवडकर तसेच देशभरातून आलेले कलाकार उपस्थित होते.

    सांस्कृतिक देवाण घेवाणीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता व अखंडता बळकट करण्याच्या हेतूने केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे दिनांक ११ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

    यावेळी तेजस्विनी साठे यांच्या चमूने कथक नृत्य सादर केले. पार्श्वगायक मोहित चव्हाण यांनी देखील यावेळी गाणी सादर केली.