बंद

  10.05.2022 : पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूर आणि भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर नेले : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

  प्रकाशित तारीख: May 10, 2022

  पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूर आणि भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर नेले : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ संतूर वादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

  पंडित शिवकुमार शर्मा यांचे आकस्मिक जाणे धक्कादायक आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूर वाद्य तसेच भारतीय शास्त्रीय संगीत आपल्या अद्भुत अदाकारीने जागतिक स्तरावर नेले. चिंतनशील असलेल्या पंडित शिवकुमार शर्मा यांनी आपल्या वादनातून शास्त्रीय संगीतात नवनवे प्रयोग यशस्वी करून दाखविले. एक महान कलाकार, श्रेष्ठ गुरु, संशोधक आणि सुहृद व्यक्ती असलेल्या शिवकुमार शर्मा यांनी अनेक उत्तम शिष्य घडवले आणि संगीत विश्व समृद्ध केले.

  पं. शर्मा यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे सुपुत्र पंडित राहुल शर्मा तसेच इतर कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.