बंद

    10.02.2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबई येथे आगमन; राज्यपालांनी केले स्वागत

    प्रकाशित तारीख: February 10, 2023

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबई येथे आगमन; राज्यपालांनी केले स्वागत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या मुंबई भेटीसाठी आगमन झाले.

    छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुन मुंबई ते सोलापूर व मुंबई ते साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवी झेंडी दाखवून रवाना करणार आहेत

    पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतील मरोळ येथील दाऊदी बोहरा समजाची शैक्षण‍िक संस्था अलजामिया-तुस-सैफियाचे (सैफी अकादमी) देखील उदघाटन होणार आहे.