बंद

  10.01.2022 : राज्यपालांच्या हस्ते ‘कर्मयोद्धा राम नाईक’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

  प्रकाशित तारीख: January 10, 2022

  राज्यपालांच्या हस्ते ‘कर्मयोद्धा राम नाईक’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

  उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्यावरील विविध मान्यवरांच्या लेखांचे संकलन असलेल्या ‘कर्मयोद्धा राम नाईक’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. १०) राजभवन येथे संपन्न झाले.

  कार्यक्रमाला राम नाईक, खासदार गोपाळ शेट्टी, माजी मंत्री विनोद तावडे, आमदार मंगल प्रभात लोढा, नवभारत टाइम्सचे माजी संपादक शचिंद्र त्रिपाठी, इंकिंग इनोव्हेशन प्रकाशन संस्थेचे आनंद लिमये आदी उपस्थित होते.

  सदर पुस्तकामध्ये दिवंगत उर्दू पत्रकार व संपादक वकार रिजवी यांनी राम नाईक यांच्यावर विविध उर्दू लेखकांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन केले असून त्यामध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी यांच्या निवडक भाषणांचा तसेच राम नाईक यांच्या ‘चरैवेती, चरैवेती’ पुस्तकाला दिलेल्या विविध मान्यवरांच्या प्रस्तावनेचा देखील समावेश करण्यात आला आहे.