बंद

  09.03.2022 : महिलांनी घरकाम तसेच नोकरी करताना प्रकृतीची काळजी घ्यावी : राज्यपाल

  प्रकाशित तारीख: March 10, 2022

  महिलांनी घरकाम तसेच नोकरी करताना प्रकृतीची काळजी घ्यावी : राज्यपाल

  महिलांनी घरकाम तसेच नोकरी करीत असताना स्वत:च्या प्रकृतीची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले. जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त राजभवन येथे बुधवारी (दि ९) स्त्रीरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते.

  शिबिराचे आयोजन कामा आल्ब्लेस रुग्णालय, वोकहार्ड हॉस्पिटल व जे जे हॉस्पिटल यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

  शिबीरामध्ये परिसरातील अनेक महिलांनी आपली आरोग्य तपासणी करुन घेतली.

  यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार व कामा हॉस्पिटलचे अधिक्षक डॉ तुषार पालवे उपस्थित होते.