बंद

    09.01.2021 : भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेबद्दल राज्यपालांना दु:ख

    प्रकाशित तारीख: January 9, 2021

    भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेबद्दल राज्यपालांना दु:ख

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु केअर यूनिटला आग लागुन झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

    भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजुन तीव्र दु:ख झाले. घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप बालकांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.