बंद

    07.02.2021 : उत्तराखंड दुर्घटनेबद्दल राज्यपालांना दु:ख

    प्रकाशित तारीख: February 7, 2021

    उत्तराखंड दुर्घटनेबद्दल राज्यपालांना दु:ख

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उत्तराखंड येथील चमौली जिल्ह्यात हिमनग तुटून त्या क्षेत्रात झालेल्या दुर्घटनेबद्दल तसेच जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

    देवभुमी उत्तराखंड येथील चमौली जिल्ह्यात हिमनग तुटून झालेल्या प्रचंड हानीचे वृत्त समजुन व्यथित झालो. दुर्घटनेत काही निरपराध लोकांना जीव गमवावा लागला याचे तीव्र दु:ख झाले. या दुर्घटनेत सापडलेल्या लोकांच्या सुखरुप सुटकेसाठी मी प्रार्थना करतो तसेच मृत झालेल्या व्यक्तींच्या नातलगांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या सन्देशामध्ये म्हटले आहे.