बंद

    06.03.2023: “करमरकर राज्याच्या क्रीडा विकासाचे साक्षीदार”: राज्यपाल रमेश बैस

    प्रकाशित तारीख: March 6, 2023

    “करमरकर राज्याच्या क्रीडा विकासाचे साक्षीदार”: राज्यपाल रमेश बैस

    ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, संपादक, समीक्षक आणि समालोचक वि. वि. करमरकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी दुःख व्यक्त केले आहे.
    श्री करमरकर सच्चे क्रीडा प्रेमी, उत्कृष्ट क्रीडा पत्रकार व मराठी समालोचन क्षेत्रातील आघाडीचे व्यक्तिमत्व होते. स्वातंत्रोत्तर काळातील राज्याच्या एकूणच क्रीडा विकासाच्या मोठ्या कालखंडाचे ते अभ्यासू साक्षीदार व भाष्यकार होते. राज्यातील क्रीडा पत्रकारितेचा इतिहास त्यांच्या बहुविध योगदानाचा समावेश केल्याशिवाय अपूर्ण राहील, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.