बंद

    05.02.2021 : करोनाच्या प्रभावी नियंत्रणासाठी नॉर्वेच्या वाणिज्यदूतांनी केले भारताचे कौतुक

    प्रकाशित तारीख: February 5, 2021

    करोनाच्या प्रभावी नियंत्रणासाठी नॉर्वेच्या वाणिज्यदूतांनी केले भारताचे कौतुक

    नॉर्वेचे मुंबईतील वाणिज्यदूत आर्नी जान फ्लोलो यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. भारताशी व्यापार, हरित उर्जा, सागरी अभ्यास व पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबाबत यावेळी चर्चा झाली. मोठी लोकसंख्या असलेला एक खंडप्राय देश असून देखील भारताने करोनाचा मुकाबला अतिशय समर्थपणे केला, तसेच करोनाविरोधी लस निर्माण करून जगाला भयमुक्त केल्याबद्दल आर्नी जान फ्लोलो यांनी यावेळी भारताबद्दल प्रशंसोद्गार काढले.