बंद

  02.10.2020 : राज्यपालांचे महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

  प्रकाशित तारीख: October 2, 2020

  महात्मा गांधी यांची १५१ वी जयंती; लाल बहादूर शास्त्री यांची ११६ वी जयंती

  राज्यपालांचे महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

  महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

  दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची देखील आज ११६ वी जयंती आहे. त्यानिमित्त राज्यपालांनी शास्त्रींच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली.

  राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर, खासगी सचिव उल्हास मुणगेकर यांसह राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना यावेळी अभिवादन केले.