बंद

    02.02.2020: राज्यपालांची ऐतिहासिक रायगड किल्ल्याला भेट

    प्रकाशित तारीख: February 2, 2020

    02.02.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज ऐतिहासिक रायगड किल्ल्याला भेट दिली व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे देखील त्यांनी दर्शन घेतले. यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर आदि उपस्थित होते.