बंद

    विभाग

    जनसंपर्क विभाग

    विशेष कार्य अधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी मा. राज्यपालांचा जनसंवाद व संपर्क विभाग सांभाळतात. राज भवनच्या प्रकाशनांच्या कामातदेखिल त्यांचा सहभाग असतो. राज भवनच्या संकेतस्थळासंबंधी जबाबदारीदेखिल त्यांना देण्यात आली आहे.

    तपशील पहा

    राज्यपालांचे खाजगी सचिव

    मा. राज्यपालांचे खाजगी सचिव मा. राज्यपाल महोदयांचा पत्रव्यवहार पाहतात. तसेच मा. राज्यपालांकडे येणा-या व त्यांचेकडून जाणा-या नस्तींची नोंद ठेवतात. मा. राज्यपालांना लघुलेखनिक म्हणूनमदत करतात, तसेच त्यांची खाजगी स्वरुपाची कामे करतात.

    तपशील पहा

    लेखा विभाग

    लेखा विभाग ही शाखा माननीय राज्यपालांचे परिवार प्रबंधक कार्यालय तसेच राज्यपालांचे सचिवालय या दोन्ही आस्थापनांची ही सामसायिक शाखा आहे. खर्चांचे योग्य विनियोजन, अर्थसंकल्प तयार करणे, वेतन आणि भत्ते यांचे आहरण, लेक्षा आक्षेपांचे निराकरण इत्यादी कामे या शाखतर्फे केली जातात. लेखा अधिकारी हे वेतन व आकस्मिक देयकांबाबत आहरण व वितरण अधिकारी म्हणून काम पाहतात.

    तपशील पहा

    शिक्षण विभाग

    राज्यपाल सचिवालयातील शिक्षण शाखा मा. राज्यपाल महोदयांना त्यांच्या कुलपती या नात्याने राज्यातील विविध विद्यापीठाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सहाय्य करते. सध्या राज्यामध्ये खालील नमूद केलेली २२ सार्वजनिक विद्यापीठे कार्यरत आहेत. Universities in the State University Type No. of Universities पारंपारिक विद्यापीठे ११ कृषी विद्यापीठे ४ तंत्रशास्त्र विद्यापीठ १ मुक्त विद्यापीठ १ संस्कृत विद्यापीठ १ आरोग्य विज्ञान […]

    तपशील पहा

    आदिवासी / जनजाती विभाग

    पेसा [पीडीएफ – 70.9 केबी] अनुसूचित क्षेत्र अंतर्गत १२ जिल्हे आणि ५९ तालुके यांचे जनगणना निर्देशक अनुसूचित क्षेत्रातील भूसंपादना बाबत महसूल आणि वन विभागाच्या सुचना [पीडीएफ – 940 केबी] महसूल व वन विभाग यांची अधिसूचना – अनुसूचित क्षेत्रामधील गौण खनिजांसाठी परवाना देणे [पीडीएफ – 237 केबी] पेसा नुसार विविध कायद्यांमध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारणांवर इएनव्हीआरओ अहवाल […]

    तपशील पहा

    वि‍कास मंडळ विभाग

    संविधानाच्या अनुच्छेद ३७२(२) अन्वये राष्ट्रपतींच्या आदेशानुसार महाराष्ट्राचे राज्यपाल यांचेवर विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र प्रदेशांसाठी स्वतंत्र विकास मंडळाची स्थापना करण्यासाठीची विशेष जबाबदारी सोपविण्यात आली. अशा प्रत्येक विकास मंडळाच्या क्षेत्राच्या संदर्भात अनुच्छेद ३७२(२) च्या उप-खंड (बी) आणि (सी) मध्ये निर्देशित केलेल्या विशिष्ट बाबींसाठी ही जबाबदारी आहे. राज्यपालांचे उपसचिव (वि.मं.) हे महाराष्ट्रातील सर्व विकास मंडळांच्या कामावर देखरेख […]

    तपशील पहा

    प्रशासन विभाग

    प्रशासन विभागाकडून खालील विषय हाताळले जातात :- राज्यपाल सचिव कार्यालयाच्या आस्थापनाविषयक बाबी. अधिनियम व संविधानिक विषयावरील प्रकरणे. अध्यादेशाचे प्रख्यापन राज्यविधानमंडळाची अधिवेशने ‍ अभिनिमंत्रित व संस्थगित करणे. जन्मठेप व मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या बंदयांच्या दया याचिका. शासनाच्या विविध विभागातील पदांचे सेवाप्रवेश नियम. विधीमंडळ सदस्यांची अनर्हतेबाबतची व लोक सेवकांवर खटला दाखल करण्याबाबतची प्रकरणे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व […]

    तपशील पहा